विराट देणार आणखी एक धक्का? कर्णधार पद सोडल्यानंतर आता …..

0 2,632

नवी मुंबई –   भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने दोन दिवसापूर्वीच आपण आगामी टी- ट्वेंटी वर्ल्डकप (T-20 World Cup) नंतर भारतीय संघाचा टी-20 मधील नेतृत्व सोडणार असल्याची माहिती दिली आहे. विराट आता फक्त वनडे आणि टेस्ट संघाचा नेतृत्व करणारा आहे. विराटने हा निर्णय घेतल्यानंतर आता तो आयपीएलमध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं (RCB) कर्णधारपदही सोडणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. याच कारण म्हणजे आयपीएलमध्ये विराटचा कॅप्टन्सीचं रेकॉर्ड खराब आहे.(Another blow to Virat? After leaving the captaincy, now …..)

विराटने आरसीबीला एकही ट्रॉफी जिंकवून दिलं नाही, एवढच नाही तर त्याची विजयाची टक्केवारीही 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे. 2013 साली विराट कोहलीला आरसीबीचं नेतृत्व देण्यात आलं, यानंतर त्याच्या नेतृत्वात टीमला 60 मॅच जिंकता आल्या, तर त्यांना 65 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीची विजयी टक्केवारी 48.04 एवढी आहे.

मतदान कार्ड येणार घरी , या पद्धतीचा वापर करून बनवा आपला ऑनलाईन ओळखपत्र

Related Posts
1 of 65

बँगलोरच्या टीमने विराटवर मागची 8 वर्ष विश्वास दाखवला, पण आयपीएल 2021 विराटसाठी अखेरची संधी ठरू शकते. पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये 10 टीम खेळणार आहेत, तसंच खेळाडूंचा मेगा ऑक्शनही होणार आहे. यावेळी बँगलोरला ट्रॉफी जिंकता आली नाही, तर टीम विराटच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची शक्यता आहे अशी माहिती समोर आली आहे.(Another blow to Virat? After leaving the captaincy, now …..)

 हे पण पहा – संजय राऊतांना अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार असं कळतंय – चंद्रकांत पाटील

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: