मुंबई पोलिसांना आणखी एक धक्का, लाचखोरी प्रकरणात पोलीस निरीक्षकाला अटक

0 331
 नवी मुंबई –  मनसुखहिरन  हत्या प्रकरण (Mansukhhiran murder case) , शंभर कोटी प्रकरणामुळे (One hundred crores case) चर्चेत आलेल्या मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) प्रतिमेला आणखी एक धक्का बसला आहे. गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश पुराणिक (Nagesh Puranic) यांना ॲन्टी करप्शन ब्युरो (Anti-Corruption Bureau) च्या पथकाने दोन लाख रुपयांची लाच घेताना पकडले. बीएमडब्ल्यू कार चोरीचे प्रकरणात मालमत्ता कक्षाने ही कारवाई केली आहे.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार  बीएमडब्ल्यू कार चोरीचे प्रकरणात एका महिलेचे पती आणि त्यांचा मित्र यांचा सहभाग आढळला आहे . या दोघांवर कारवाई न करण्यासाठी नागेश पुराणिक यांनी १२ लाखांची मागणी केली. पती आणि त्यांच्या मित्राला कारवाईपासून वाचविण्यासाठी महिलेने चार लाख रुपये काही दिवसांपूर्वी दिले. उर्वरीत आठ लाखांसाठी पुराणिक तगादा लावू लागले. एवढी रक्कम जमविणे शक्य नसल्याने तडजोडी अंती आणखी चार लाख रुपये देण्याचे ठरले.
Related Posts
1 of 1,603

महिलेला चार लाखाची रक्कम जमा करणे अशक्य जात होते आणि पुराणिक पैशांसाठी मागे लागले असल्याने या महिलेने ॲन्टी करप्शन ब्युरोच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करून ॲन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने मालमत्ता कक्षाच्या भायखळा येथील कार्यालयात सापळा रचला. यावेळी तक्रारदार महिलेकडून दोन लाख रुपये घेताना पुराणिक यांना पकडण्यात आले. ॲन्टी करप्शन ब्युरोने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुरुषांचे हे तीन गुण अभिनेत्री मलायका अरोराला करतात आकर्षित

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: