नावानंतर फेसबुकचा आणखी एक मोठा निर्णय.., आता चेहऱ्याची ओळख होणार नाही

0 119
 नवी मुंबई –  जगात सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग अॅप (Social Networking App) पैकी एक असलेल्या फेसबुक (Facebook) ने नुकताच आपल्या नावात बद्दल करण्याचा निणर्य घेतला होता त्यानुसार आता फेसबुक मेटा (Meta) या नावाने ओळखला जात आहे. तर आता फेसबुक चे मलिक मार्क झुकरबर्ग यांनी एक आणखी मोठा निर्णय घेत आता चेहऱ्याची ओळख (facial recognition) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  (Another big decision of Facebook after the name .., now the face will not be recognized)
नुकताच फेसबुक एक ब्लॉग प्रसिद्ध केला आहे.  यामध्ये सांगण्यात आले आहे की, या पुढे फेसबुक facial recognition प्रणाली ही बंद करण्यात येणार आहे. या प्रणालीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे १ अब्जाहून अधिक लोकांच्या चेहऱ्यांचे टेम्पलेट हटवले जाणार आहे. दररोज 600 मिलियन अकाऊंट facial recognition प्रणालीचा वापर करत असतात. आता ही प्रणाली बंद करण्यात आल्यामुळे यापुढे फेसबुकमध्ये फोटो आणि व्हिडीओमधून लोकांची ओळख होणार नाही.
आपण बऱ्याच वेळा फोटो टॅग करत असताना चेहऱ्यावर नाव येतात, ही प्रक्रिया आता बंद होईल. facial recognition या पद्धतीबद्दल अनेक लोकांनी चिंता व्यक्त केली होती. याबद्दल अनेक वादही झाले होते. त्यामुळे कंपनीने facial recognition प्रणाली बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा आता काय परिणाम होते हे पाहावे लागणार आहे. (Another big decision of Facebook after the name .., now the face will not be recognized)
Related Posts
1 of 1,481
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: