संतापजनक… मुलानेच केला कोयत्याने बापाचा खून; परिसरात दहशत

0 268
minor son, kills father; Because the police were shocked to hear

 

सांगली – देशासह राज्यात दररोज काही ना काही धक्कादायक घटना घडत असतात अशीच एक धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील समोर आली आहे या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

जन्मदाता बापाचा कोयत्याने वार करुन खून

23 वर्षीय मुलाने जन्मदाता बापाचा कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना सांगली मधील कुरळप (ता. वाळवा) येथे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी करवाई करत प्रथमेश सुरेश पाटील (वय 23, रा. वशी) याला अटक केली आहे. सुरेश भीमराव पाटील (वय 45, रा.वशी) असे खून झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून मात्र अद्याप खुनाचा कारण स्पष्ट झालेला नाही.

 

Related Posts
1 of 2,190

मिळालेल्या माहितीनुसार सुरेश पाटील यांना दारूचे व्यसन होते. त्या व्यसनापायी ते मिळेल ते काम करीत असत. दरम्यान, मंगळवारी कुरळप येथील गाव कमानीलगत असणार्‍या कट्ट्यावर सुरेश पाटील दारूच्या नशेत बसले असताना मुलगा प्रथमेश याने धारधार कोयत्याने त्यांच्या मानेवर जोरदार वार केला. त्यांची मान तुटली. लगेचच दुसरा वार तोंडावर केला. यामध्ये त्याचा जबडा पूर्णपणे तुटला होता.

 

रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी अवस्थेत सुरेश पाटील यांना कुरळप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेे. परंतु उपचारापूर्वीच सुरेश पाटील यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

 

सुमारे अर्ध्या तास सुरेश पाटील जखमी अवस्थेत आरोग्य केंद्रात पडून होते. वैद्यकीय अधिकारी नुकतेच निघून गेले होते. ते परत येईपर्यंत सुरेश पाटील तळमळत पडले होते. डॉ. चौगुले यांनी त्याची पाहणी करून त्यांना पुढे उपचारासाठी पाठविले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: