संतापजनक ! मंदिरात पुजारी करत होता अश्लील चाळे; भाविकांनी पकडला रंगेहात अन् ..

0 795

 अहमदनगर –  अहमदनगर शहरात (Ahmednagar City ) एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील औरंगाबाद महामार्गावरील (Aurangabad Highway)एका मंदिरात पुजाऱ्याला एका महिलेसोबत अश्लील चाळे करत असता भाविकांनी रंगेहात पकडले असून त्या पुजाऱ्याला चांगलाच चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (social media) चांगलाच व्हायरल (viral) होत असून नागरिकांमधून या घटनेनंतर संताप व्यक्त होत आहे.

शहराचा पारा सध्या चांगलाच तापला आहे. दुपारच्या वेळी कडक उन्हामुळे सध्या या मंदिरात गर्दी कमी असते. याचाच फायदा घेत तो पुजारी महिलेसोबत अश्लील चाळे करत होता.ही गोष्ट मंदिरात असणाऱ्या इतर भाविकांना लक्षात येताच त्यांनी पुजाऱ्याला आणि महिलेला रंगेहाथ पकडून चांगलाच चोप दिला. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Related Posts
1 of 2,326
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: