संतापजनक ! डॉक्टरनेच केले अल्पवयीन मुलगीवर अत्याचार; गुन्हा दाखल

0 281
Annoying! Doctor tortures minor girl; Filed a crime

 

 नांदेड –  राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. पुन्हा एकदा राज्यात धक्कादायक घटना घडली आहे. नांदेड (Nanded) शहरातील एका डॉक्टरने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे.

आपल्या दवाखान्यात कामासाठी असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने सातत्याने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टराला अटक केलीय. नांदेड जिल्ह्यातील किनवट शहरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडालीय. किनवट शहराच्या डॉक्टरलेन भागात डॉ. विकास सुंकरवार या डॉक्टरचा दवाखाना आहे. या दवाखान्यात एक अल्पवयीन मुलगी गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी म्हणून काम करत होती.

Related Posts
1 of 2,326

डॉ. सुंकरवार याने पीडित मुलीस वेगवेगळी आमिषे दाखवली. एवढचं नव्हे तर धमकी देत दिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केला. नोव्हेंबर २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत डॉक्टरने सतत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित अल्पवयीन मुलीने केला आहे. अत्याचारामुळे अल्पवयीन पीडिता ही गर्भवती राहिली होती. पीडितेच्या पोटात काल दुखू लागल्याने तिला नातेवाईकांनी शहरातील एका नामांकित दवाखान्यात आणले. तेथील डॉक्टरांनी पीडितेची तब्येत पाहून काही चाचण्यांसाठी तिला अन्य एका दवाखान्यात पाठविले.

 

 

पीडित मुलीचा चाचणीपूर्वीच गर्भपात झाल्याने तिला तातडीने गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी पीडित मुलीने इन कॅमेरा जबाब नोंदवला आहे. डॉ. विकास सुंकरवार यानेच आपल्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा जबाब तिने पंचासमक्ष नोंदविला आहे. पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी नराधम डॉ. विकास सुंकरवार याला तातडीने ताब्यात घेतलं. त्याच्याविरूद्ध कलम ३७६, पोक्सो ४, ६ व इतर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक घुले अधिक चौकशी करत आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: