संतापजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वैद्यकीय तपासात धक्कादायक खुलासा ..

0 325
Shocking! Sexual abuse of a minor grandchild showing porn
प्रतिनिधी DNA मराठी टीम 
सातारा  –  सातवीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) अत्याचार (Abuse)केल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील (Satara) खटाव तालुक्यात घडली आहे.  या घटनेनंतर या अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता अल्पवयीन मुलगी चार महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक खुलासा झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडीतेच्या आईने औंध पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास सुरु केला आहे.
Related Posts
1 of 2,326
 या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  खटाव तालुक्यातील अल्पवयीन मुलगी ही इयत्ता सातवीत शिकत आहे. पीडीत मुलीच्या पायाला सूज आल्याने कुटुंबीयांनी नजीकच्या मोठ्या गावातील एका खाजगी डॉक्टरांकडे 6 एप्रिलला उपचारासाठी नेले होते. त्यांनी उपचार करुन औषध दिले. मात्र, या औषधाने फरक न पडल्यास वडूज येथे उपचारास जाण्यास सांगितले होते. औषधोपचाराने फरक न पडल्याने 8 एप्रिलला पीडीत मुलीस वडूज येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीअंती मुलगी गरोदर असल्याचे सांगून डॉक्टरांनी तीला सातारा येथे उपचारासाठी पाठवले. दरम्यान, पीडीत मुलीच्या कुटुंबाने मुलीस या प्रकाराची माहिती विचारली.

पिडीत मुलगी काही सांगू शकत नसल्याने कुटुंबीयांनी तिला 11 एप्रिलला सातारा येथे उपचारासाठी नेले. सातारा येथील रुग्णालयात तपासणी केली असता पीडीत मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मुलीच्या भोळसट स्वभावाचा गैरफायदा घेवून अज्ञाताने अत्याचार केल्याचे पीडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: