न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, महाराष्ट्राकडे नेतृत्व

0 385
 नवी मुंबई –  मायदेशात  होणाऱ्या न्युझीलंड (New Zealand) विरुध्द दोन कसोटी सामन्याची मालिकांसाठी भारतीय संघाची  घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच बरोबर रोहित शर्माला (Rohit Sharma) देखील या मालिकेतून  विश्रांती देण्यात आली आहे. (Announcement of Indian team for Test series against New Zealand, lead to Maharashtra)
तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा नेतृत्व करणार असून चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) ला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली संघाची कमान सांभाळणार आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत यांना न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत वृद्धिमान साहा यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल, तर केएस भरत या मालिकेतील दुसरा यष्टीरक्षक असेल.

न्यूझीलंड संघ टी-२० वर्ल्डकप संपल्यानंतर थेट भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडसोबत कसोटीसोबत तीन टी-२० सामन्यांचेही आयोजन करण्यात आले आहे. जयपूर, रांची आणि कोलकाता येथे टी २० सामने असतील.  .

या दौऱ्यापूर्वी बीसीसीआय (BCCI) नवीन कोचिंग स्टाफची घोषणा करू शकते. विक्रम राठोर फलंदाजी प्रशिक्षक, टी. दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि पारस म्हाम्ब्रे गोलंदाजी प्रशिक्षक असतील. सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक राठोर त्यांच्या पदावर कायम राहू शकतात. राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करेल.(Announcement of Indian team for Test series against New Zealand, lead to Maharashtra)

Related Posts
1 of 65

लाच घेतल्या प्रकरणी आरोग्य निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक ACB च्या जाळ्यात

असा असणार भारतीय संघ 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: