अनिल देशमुख ‘नॉट रिचेबल’…? ‘ईडी’कडून शोधाशोध…….

0
 नवी मुंबई –  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त  परमबीर सिंह यांनी लावलेल्या १०० कोटीच्या आरोपावरून ईडीने अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तपास सुरू केला आहे. याच कारणाने ईडीने मागच्या काही दिवसापासून या आरोपाची तपस सुरु केली आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
तर रविवारीही त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले. या छाप्यानंतर देशमुख यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अनिल देशमु ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर आली आहे. अटकेच्या भीतीने देशमुख गायब झाले असल्याचं बोललं जात असून, ईडीकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, देशमुख यांनी प्रत्यक्ष हजर राहणं अशक्य असल्याचं कारण दिलं होतं. त्यानंतर रविवारी ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील दोन निवासस्थानावर छापे टाकले. काटोल आणि दुसऱ्या ठिकाणी असलेल्या घरांची झाडाझडती केल्यानंतर ईडीकडून देशमुख यांची चौकशी केली जाणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता देशमुख यांचा फोन लागत नसल्याची माहिती समोर आली आहे. ईडीकडून अटक होण्याची शक्यता असल्याने ते नॉट रिचेबल झाले असल्याची वृत्त आहे.
Related Posts
1 of 1,184
अनिल देशमुख यांना आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावण्यात आलेलं आहे. मात्र, तीनही वेळा अनिल देशमुख यांनी चौकशीला जाणं टाळलं. मागील आठवड्यात बजावण्यात आलेल्या समन्सपासून देशमुख नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांचा शोध ईडीकडून घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या पत्नी व मुलालाही ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: