संतप्त पूरग्रस्त शेतकऱ्यांची मदतीसाठी हाक, मंत्र्यांचे दौरे फक्त फोटो सेशन साठी का ?

0 163

शेवगाव –   तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा आमदार, मंत्री यांनी दौरा केला परंतु हा दौरा फक्त फोटो सेशन साठी मर्यादित होता का ? असा प्रश्न पूरग्रस्त शेतकऱ्यांमधून केला जात आहे, पूर येऊन आज रोजी 13 दिवस उलटून गेले आहेत, तरीदेखील पंचनामा व्यतिरिक्त शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची तातडीची मदत मिळाली नाही.

शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या,अनेकांची घरे कोसळली त्यांना राहण्यासाठी घर नाही, जनावरांना चारा नाही, लाईट नाही,खायला धान्य नाही, पिण्यासाठी पाणी नाही,एवढे असून देखील शासनाची तातडीची कोणत्याही प्रकारची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही.  आता तर सर्व गेलेलेच आहे परंतु मदत काय जनावरा प्रमाणे माणसे वाहून गेल्यावर मिळणार  का ? असा नाराजीचा सूर शेतकरी वर्गातून ऐकायला मिळत आहेत.

हे पण पहा –किरीट सोमय्या यांना देणार करारा जवाब | मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलवली तातडीची पत्रकार परिषद

Related Posts
1 of 1,292

पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले होते,परंतु दोन दिवस जेवण या व्यतिरिक्त कोणीही ठोस मदत केल्याचे दिसून येत नाही, सत्तेत असलेल्या मंत्री तनपुरे व त्यांच्यासोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दौरे केले,परंतु मदत देण्यास ते कमी पडत आहेत हे चित्र समोर दिसत आहे याबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आणखी पहाणी दौरा तर सोडाच परंतु जिल्ह्यात कोठेही फिरकले सुद्धा नाहीत.  पावसाने शिवार होत्याचं नव्हतं केलं,नंदीनी नदीकाठच्या लोकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झालेले पाहायला मिळत आहे.   यामध्ये आखेगाव, खरडगाव, वरुर, भगूर,वडुले, गावातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत,जनावरांच्या दावणी ओस  पडलेल्याआहेत,सर्वत्र घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य झालेले आहे, त्यामुळे जनसामान्यांचे आरोग्य देखील धोक्यात आलेले आहे.

रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात जातानाच पकडला रंगेहाथ …

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: