अज्ञात चोरट्याने कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून पळविले 71 हजार रुपये

0 166
An unidentified thief broke into a house and stole Rs 71,000

प्रतिनिधी- DNA मराठी टीम 

श्रीगोंदा  :- श्रीगोंदा शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून तब्बल 71 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी चंद्रकला दत्तात्रय सुपेकर रा.शिक्षक कॉलनी,श्रीगोंदा  ता.श्रीगोंदा, यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts
1 of 2,427
श्रीगोंदा शहरातील चंद्रकला दत्तात्रय सुपेकर (वय 35 वर्ष, धंदा घरकाम, रा.शिक्षक कॉलनी,श्रीगोंदा) हे आपले घरकाम करून उपजीविका करतात दि .8 एप्रिल रोजी रात्री उशिरा 12 ते 3 च्या दरम्यान वा.ते 03/30 वा.चे दरम्यान अज्ञात चोरट्याने दरवाज्याचा कडीकोयंडा कटावणीच्या साह्याने उचकटून घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले 71 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे मौल्यवान दागिने तसेच सागर विठ्ठल जाधव यांचे घराची बाहेरील कडी काढुन आत प्रवेश करून मोठ्या प्रमाणात उचकपाचक केली आहे.  असा एकूण मिळून 71 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला आहे.
 याप्रकरणी चंद्रकला सुपेकर यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेचा पंचनामा करूनअज्ञात चोरट्याच्या विरोधात गु. रजि.नं व कलम 244 /2022 भा.द.वि.क. 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास तपासी अंमलदार स.फौज.व्ही.एम. .बडे, हे करत आहेत.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: