अनुराधा नागवडे यांच्या उपस्थितीत प्रियांका गांधींच्या अटके निषेधार्थ श्रीगोंद्यात आंदोलन

0 211
 श्रीगोंदा  :-  अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस (Ahmednagar District Youth Congress), श्रीगोंदा तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस व तालुका विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने या शेतकरी विरोधी कृत्यांचा तसेच, जेष्ठ नेत्या प्रियांका गांधी यांच्या अटकेचा निषेध व्यक्त करत  आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे (Anuradha Nagwade) म्हटल्या की, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे आणि तो अतिशय भयावह होता. ज्यात केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने आपल्या कारने शेतकऱ्यांना चिरडले आहे.

दुसरीकडे, जेव्हा आदरणीय प्रियांका गांधी(Priyanka Gandhi) जी शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटायला जात होत्या, तेव्हा त्यांना आणि काँग्रेस पक्षाच्या इतर नेत्यांना अटक करण्यात आली. आम्ही या अराजकतेला, हुकूमशाही प्रवृत्तीला विरोध करतो.असे त्यांनी नमूद केले. सद्यस्थितीला जेव्हा भाजप सरकार शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरत आहे, तेव्हा भाजपचे लोक अशा घाणेरड्या राजकारणावर उतरले आहेत.

 हे पण पहा – श्रीगोंदा तालुक्यात मुसळधार पावसाने शेतीचे नुकसान…

यावेळी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका काँग्रेस पक्षाच्या जि.प. सदस्या अनुराधाताई नागवडे, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील भोसले, श्रीगोंदा नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितलभैया वाबळे, जिल्हा सरचिटणीस बाळाप्पा पाचपुते, कारखान्याच्या संचालिका लकडे ताई, काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सतिश मखरे, प्रशांत गोरे , गणेश भोस, समीर बोरा, संतोष कोथांबीरे, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष आदिल शेख, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सकलेन शेख, शहराध्यक्ष धीरज खेतमाळीस, भूषण शेळके, नंदकुमार ससाणे, अजय रंधवे, सागर बेल्हेकर, किरण चव्हाण आदी उपस्थित होते.

Lakhimpur Kheri, परवानगी नाकारल्यानंतरही राहुल गांधी रवाना

Related Posts
1 of 1,518
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: