शॉर्ट सर्किटमुळे एक एक्कर आंब्याची बाग जळाली, शेतकऱ्याचे झाले लाखोंचे नुकसान

श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील सुभाष सोनबा नेटके यांची गट.नंबर 302 येथील 1 एकर हापुस,केशर व इतर जातीचे अंब्याची (mango) झाडे काही क्षणातच जळून खाक झाली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त आशा आहे की आरणगाव दुमाला येथील सुभाष सोनबा नेटके यांची आरणगाव दु.येथील गट.नं.302 मध्ये त्यांच्या सुन रेखा संजय नेटके यांच्या नावे असणाऱ्या क्षेत्रामध्ये आंब्याची झाडे तसेच जमिनीच्या दोन्ही बाजूंनी साग व नारळ तसेच इतर फळझाडे अंदाजे वीस वर्षांपूर्वी लागवड केलेली आहेत, व त्यांच्या बागेमधील आंब्याच्या सर्वच झाडांना मोठ्या प्रमाणात आंबा लागलेला होता, तसेच नारळानां मोठ्या प्रमाणात नारळ होते. तसेच बागामध्ये चिकु,लिंबु इतरही काही झाडे होते.
Related Posts
दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या क्षेत्रांमधून गेलेल्या लाईटच्या मेन लाईचे शॉर्टसर्किट झाले व आंब्याच्या बागेला आग लागून काही क्षणातच आगीने संपूर्ण बाग जळून गेला, आग इतकी भयंकर होती की ती विजवणे ही शक्य नव्हते,तसेच त्यांच्या शेजारी दिलीप मोरे यांच्या लिंबू ची बाग व काढून ठेवलेल्या कांद्याचे ही जळून नुकसान झाले आहे. आधीच शेतकरी आर्थिक संकटात आहे त्या मध्ये शाॅटसर्किट मध्ये लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सदरील घटनास्थळी तलाठी गायकवाड मॅडम, कृषी सहाय्यक आरणगाव हिरवे मॅडम, मंडळ कृषी अधिकारी बेलवंडी यांनी येऊन पंचासमक्ष पंचनामा केला,तसेच सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र चव्हाण, संजय शिंदे,सरपंच बाळासाहेब सातव पोपट कुताळ, केशव शिंदे, सचिन शिंदे, भाऊसाहेब चव्हाण, दिलीप मोरे, गोविंद नेटके,नवनाथ चव्हाण,पत्रकार अमोल बोरगे इत्यादींनी भेट दिली.