DNA मराठी

गुटखा चोरी प्रकरणात अमोल अजबे यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली

0 550
Gutkha, pot, liquor sales in full swing, the world is ruined, the eyes of the police

 

श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील काष्ठी लिंपणगाव रोडवर हॉटेल अनन्या जवळ दि 8 एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात गुटख्यावर कारवाई झाल्याचे पोलिसांनी दाखवले मात्र पडद्याआड काही वेगळेच गौडबंगाल होते असेच चित्र पाहण्यास मिळाले या प्रकरणात दोषी असल्याचा ठपका ठेवत पोलीस नाईक अमोल अजबे यांची अहमदनगर पोलीस मुख्यालयी बदली करण्यात आली आहे.

Related Posts
1 of 2,452
श्रीगोंदा काष्ठी रोडवरील हॉटेल अन्यन्या जवळ दि 8 एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात गुटखा चोरी झाल्याची घटना घडली होती.  यामध्ये पोलिसांनी तरबेजपणा दाखवून किरकोळ गुटख्याची कारवाई दाखवत गुन्हा दाखल केला होता मात्र त्यात अजूनही गुटखा होता तो गुटखा चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यावर आल्यावर नाशिक परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार अहमदनगर पोलीस अधीक्षक यांनी उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्याकडे चौकशी करण्याचेआदेश पारित केल्यावर उपविभागीय पोलीस अधीक्षक यांनी अनेक पोलिसांचे जाब  जबाब नोंदविले तसेच विविध संघटनेचे दिलेल्या निवेदनांनुसार जबाब नोंदविण्यात आले त्यानंतर अचानक अहमदनगर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस नाईक अमोल अजबे यांची गुटखा प्रकरणात चौकशी दरम्यान दोषी आढळल्यामुळे त्याची तात्काळ तडकाफडकी पोलीस मुख्यालय अहमदनगर या ठिकाणी बदली करण्यात आली आहे त्या बदलीने पोलीस तसेच गुटखा व्यवसायिक यांना झटका बसल्याची खुलेआम चर्चा होताना दिसत आहे.
गुटख्यात अजूनही कर्जत आणि श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे कर्मचारी ?
कर्जत तसेच श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याचे रॅकेट सक्रिय असून अजबे फक्त नावालाच बळी ठरला आहे अजूनही श्रीगोंदा आणि कर्जत पोलीस ठाण्याचे अजूनही दोन पोलीस या प्रकरणाशी निगडित असल्याने त्याचेवर कधी कारवाई होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राजधानीचा एक नेता करणार उपोषण ?
तालुक्यातील राजधानी समजल्या जाणाऱ्या गावातील एक बडा नेता पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात गुटखा संबंधी प्रकरणात दोषी असणाऱ्या सर्व पोलिसांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आमरण उपोषण करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे पण तो नेता कोण? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: