मोठी बातमी! दोन शहरांमध्ये पुन्हा अंदाधुंद गोळीबार, हल्लेखोराला अटक

America News: अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. मॉन्टेरी पार्कमधील गोळीबाराची घटना कॅलिफोर्नियातील जनता अजूनही विसरली नव्हती की, कॅलिफोर्नियातील हाफ मून बे शहरातच सामूहिक गोळीबाराची घटना समोर आली आहे.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर अमेरिकन शेरीफने (यूएस पोलीस) हल्लेखोराला अटक केली आहे. याशिवाय आयोवा येथील एका शाळेत गोळीबाराची आणखी एक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
कॅलिफोर्नियातील हाफ मून बे शहराबद्दल सांगायचे तर, येथे सोमवारी एका हल्लेखोराने एकाच वेळी अनेकांवर गोळीबार सुरू केला. काउंटीच्या शेरीफ कार्यालयाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. हल्लेखोराला काही वेळातच अटक करण्यात आली.