आधीच खड्ड्यांचे साम्राज्य…. वरूनऐरटेल साठी खोदकाम….

0 12

श्रीगोंदा  :- श्रीगोंदा तालुका परिसरातील  रस्ते पावसामुळे खराब आणि खड्डेयुक्‍त झालेले असताना तालुक्यातील चांडगाव  टाकळी परिसरात ऐरटेल ‘साठी खोदकाम जोमाने सुरू आहे. वैतागलेले नागरिक या खोदकामामुळे त्रस्त झाले आहेत. मात्र तालुका  प्रशासन आणि सत्ताधारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्‍त होत आहे.

श्रीगोंदा तालुक्यात यावर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर परतीच्या पावसाने सुमारे महिनाभर मुक्काम ठोकल्याने शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनिय झाली. खड्डे बुजविण्याच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी ठेकेदारांच्या तिजोऱ्या भरण्याचेच काम केले. खड्डे बुजविण्याचे बिनदिक्कतपणे सांगितले जात आहे. मात्र गेल्या महिनाभरात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दुप्पटीने वाढ झाली आहे.

मैत्री तोडली म्हणून तरुणीवर चाकूने हल्ला, तरुणावर गुन्हा दाखल  

या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करीत पालिका प्रशासनाने शहरतील रस्ते खोदण्याची ‘ऐरटेल’ मोबाईलला परवानगी दिली आहे. या कंपनीच्या ठेकेदारांनी शहरातील अनेक रस्त्यांवर खोदाई करत तालुक्यातील  अडचणीत भरच टाकली आहे.असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही ज्या ठिकाणी खड्डे खोदून केबल टाकली गेली, त्या ठिकाणच्या चारी व्यवस्थित बुजविण्याची तसदीदेखील घेण्यात आलेली नाही. उखडलेले रस्ते आहे तसे ठेवण्यात आल्यामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. नागरिकांना वेठीस धरून ठेकेदारांची तळी उचलणारे आणि ‘ऐरटेल’च्या माध्यमातून स्वत:चे उखळ पांढरे करून घेणारे शहरवासियांच्या अडचणींकडे लक्ष देणार तरी कधी? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे.
Related Posts
1 of 1,301
खोटी माहिती देण्याचा प्रयत्न
सध्या शहरात एअरटेलच्या केबलसाठी रस्ते खोदले जात आहेत. मात्र याबाबत विचारणा करणाऱ्या नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आणि खोटी माहिती दिली जात आहे. काही ठिकाणी ड्रेनेजसाठी तर काही ठिकाणी चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी खोदाई केली जात असल्याचे सांगितले जात आहे. हा खोटारडेपणा कोण करतेय हे देखील उजेडात आणण्याची गरज नागरिक व्यक्‍त करत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग अंधारात
श्रीगोंदा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचारी याना रस्ते खोदाई बाबत माहिती दिली असता खोदाई करणारे ठेकेदार सांगतात कि आम्ही परवानगी घेतली आहे मात्र याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कोणत्याही प्रकारची कल्पना नसल्याचे निदर्शनाला आले आहे
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: