साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी भोर यांना सर्वपक्षिय पाठिंबा : रविंद्र कडूस

0 58

 

अहमदनगर : साकळाई उपसा जलसिंचन योजना मार्गी लावणेसाठी जगभाथ भोर प्रयत्नशील असून त्यास सर्व सारोळाकरांचा पूर्ण पाठिबा आहे. ह्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ पक्षीय मतभेद विसरून तन, मन, धनाने काम करू असे पंचायत समिती माजी सदस्य रविंद्र कडूस यांनी व्यक्त केले आहे.

 

साकळाई उपसा जलसिचन योजना मंजूरीसाठी श्री जगन्नाथ भोर यांनी सारोळा कासार येथे बैठक घेतली. सदर बैठकीत कडूस बोलत होते. प्रस्ताविक उपसरपंच श्री जयप्रकाश कडूस पाटील यांनी केले.

 

 

Related Posts
1 of 2,088

सदर योजना सारोळा कासारच्या शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. सह्याद्री घाटमाथ्यावरिल पश्चिमेला जाणारे पाणी पूर्वेला वळविल्यास साकळाई व शहांजापूर उपसा जलसिंचन योजना निश्चित मार्गी लागतील असे प्रतिपादन श्री भोर यांनी केले. संजय धामणे, संजय कडूस, पोपटराव काळे, रामचंद्र धामणे व ग्रा.पं., दूध व सहकार सोसायटीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: