गोदावरी तटावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा , ३२६९२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग

0 202

शिर्डी –  कोपरगाव तालुक्यातून (Kopargaon taluka) वाहणाऱ्या गोदावरी नदीस (Godavari river) नांदूर मध्यमेश्वर येथून काल सायंकाळी उशिरा ३२६९२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून त्यामुळे पाणी साठ्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. अशी माहिती कोपरगांवचे तहसीलदार विजय बोरूडे यांनी दिली आहे.(Alert to the citizens on Godavari bank, discharge of 32692 cusec water)

नागरिकांनी तालुका प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या कुटुंबांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, नदी, ओढे व नाल्यांच्या काठी राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहावे,  नदी अथवा नाले यावरील पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडून जाऊ नये, पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, धोकादायक झालेल्या तलावांच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, धरण व नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी.

येणाऱ्या तीन दिवस मुसळधार पाऊसाची शक्यता, जाणुन घ्या संपूर्ण माहिती

Related Posts
1 of 1,608

नदीच्या प्रवाहामध्ये उतरू नये. धोकादायक ठिकाणी चढू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडाखाली अथवा विद्युत वाहिनी जवळ थांबू नये. आपत्कालीन परिस्थितीत तहसील कार्यालय नियंत्रण कक्ष येथील दूरध्वनी क्रमांक ०२४२३- २२२७५३  यावर संपर्क करावा. असे आवाहन तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे.कोपरगांवच्या गोदावरी तटावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Alert to the citizens on Godavari bank, discharge of 32692 cusec water)

हे पण पहा – रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: