अजितदादा परवानगी द्या, सोमय्याला बघून घेतो, शशिकांत शिंदे आक्रमक

0 1,345

सातारा –   राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) सातारामध्ये शेतकरी मेळाव्यात बोलताना आपल्याला भाजपाने 100 कोटींची ऑफर दिली असा गौप्यस्फोट करत भाजपा आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांना मी म्हटलं होतं, मला परवानगी द्या, बेछूट आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांना मी पाहून घेतो. पण दादांनी सांगितलं शांततेने घ्या, म्हणून मी शांत बसलो, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे भाजपवर आणि किरीट सोमय्यांवर टीका केली आहे. (Ajitdada let go, looks at Somaiya, Shashikant Shinde is aggressive)

शेतकरी मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे यांनी भाजपवर टीका करत चांगलीच फटकेबाजी केली. ते म्हणाले आम्ही ईडीला पळवून लावणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. मागे इकडे किरीट सोमय्या आले होते. मी दादांना म्हटलं होतं, मला परवानगी द्या, त्यांना मी बघून घेतो, पण दादांनी सांगितलं सबुरीने घ्या. म्हणून शांत बसावं लागलं. आपण परिणामांची चिंता करत नाही, असं सांगताना ईडी, आणि इनकम टॅक्सच्या आपण बापाला घाबरत नाही. कारण सध्याच्या राजकारणात ईडीला पळवून लावणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, असं शशिकांत म्हणाले.

 हे पण पहा  – Eid E Milad un Nabi Ahmednagar 2021

मी निष्ठावंत, मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही

Related Posts
1 of 1,640

भाजपचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. मला मागे 100 कोटींची ऑफर दिली होती. कधी कधी वाटतं ते 100 कोटी घ्यायला पाहिजे होते. पण त्यांना कल्पणा आहे की मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही, असं शशिकांत शिंदे म्हणाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना भाजपकडून मला पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट शशिकांत शिंदे यांनी याअगोदरही केला होता. भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अनेक नेत्यांना पक्षप्रवेशाच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये माझाही समावेश होता, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला होता.(Ajitdada let go, looks at Somaiya, Shashikant Shinde is aggressive)

लवकरच फेसबुक चा बदलणार नाव ? , जाणून घ्या कारण … चर्चांना उधाण

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: