बॉलिवूड वरून अजित पवार यांचा योगी आदित्यनाथ यांना इशारा

0 513

 नवी मुंबई –   राज्यात कोरोना विषाणू (Corona virus) च्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्य सरकार (State Government) ने निर्णय घेत अनेक निर्बंध शिथिल केली आहे. या निर्णयामध्ये आज पासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह उघडण्यात येणार आहेत. राज्यात मागच्या सहा महिन्यांपासून बंद असलेली नाटकाची तिसरी घंटा आता वाजणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे तिसरी घंटा झाली. अजित पवारांच्या हस्ते नटराजांचं पूजन करुन औपचारिकरित्या नाट्यृगह पुन्हा सुरु करण्यात आली आहेत.  (Ajit Pawar’s warning to Yogi Adityanath from Bollywood)

यावेळी बोलताना अजित पवार यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर टीका करत इशारा दिला आहे. मुंबईतील बॉलिवूड बाहेर जाऊ देणार नाही. त्यासाठी सर्वोतपरी सहकार्य हे सरकार करेल आणि सुविधा उपलब्ध करून देईल. मात्र बॉलिवूड मुंबईतच राहिल असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात चक्क दोन मुलांच्या बापाने पळविले तरुणीला , गुन्हा दाखल

Related Posts
1 of 1,640

अजित पवार पुढे म्हणाले कोल्हापूरच्या चित्रपटनगरीमध्ये सुविधा देण्याचा आमचा मानस आहे. मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये अधिकच्या सुविधा देता येतील. कारण काही लोकांचा प्रयत्न चाललेला आहे की बॉलिवुड बाहेरच्या राज्यामध्ये घेऊन जायचे. त्यासाठी काही मुख्यमंत्री आले तो त्यांचा अधिकार आहे त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. पण इथेच इतक्या चांगल्या सुविधा देऊ. जेव्हा पासून चित्रपटसृष्टी सुरु झालेली आहे तेव्हापासून संपूर्ण देशाचे केंद्र मुंबई आहे. ते मुंबईच राहावं ते महाराष्ट्रातच राहावं हीच आपल्या सगळ्यांची इच्छा अपेक्षा आहे. त्याकरता महाविकास आघाडीचे सरकार सर्वोतपरी प्रयत्न करेल आणि मराठी चित्रपटनगरीकरता सूचना असतील त्या सांगा,” असे अजित पवार यांनी म्हटले आहे. (Ajit Pawar’s warning to Yogi Adityanath from Bollywood)

हे पण पहा –  ‘नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय’ | विखे म्हणतात, ‘रुको जरा सबर करो!’

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: