अजित पवार यांचा विरोधकांना इशारा , पत्रकार परिषद घेऊन करणार मोठा गौप्यस्फोट?

0 1,465

नवी मुंबई –  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी आपल्या विरोधकांना एका सूचक इशारा दिला आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यावरुन विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर त्यांनी हा इशारा दिला आहे.  आपण उद्या पत्रकार परिषद घेऊन कुठला साखर कारखाना कुणाच्या कारकिर्दीत आणि किती रुपयांना विकला गेला याची सविस्तर माहिती देणार असं म्हणत आपल्या विरोधकांना एक इशारा दिला आहे. (Ajit Pawar’s warning to the opposition, will he hold a big secret blast with a press conference?)

अजित पवार म्हणाले महाराष्ट्रात काय फक्त जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना एकटाच विकला गेला नाहीये, माझ्याकडे सर्व रेकॉर्ड आहे. परंतु मला त्याच्याबद्दल नीट पत्रकार परिषद घेऊन माहिती द्यायची आहे. माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. मी कदाचित इथे किंवा उद्या पुण्यात पत्रकार परिषद घेईल. त्या संदर्भात महाराष्ट्रात सुरुवातीपासून किती कारखाने विकले गेले, कुणा-कुणाच्या कारकिर्दीत विकले गेले. काय किमतीला विकले गेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल की काही-काही कारखाने तीन कोटी, साडे तीन कोटी, चार कोटी, पाच कोटी, काही 12 कोटी, 15 कोटी तर काही 18 कोटी अशा प्रकारे विकले गेले आहेत.

भोसरी जमीन घोटाळा प्रकरण , एकनाथ खडसेंना मोठा दिलासा

Related Posts
1 of 1,494

काही लोक जाणीवपूर्वक त्याच त्याच वस्तू आणतात आणि मीडिया पण त्याच त्याच गोष्टी दाखवतात. माझ्याविरुद्ध गरळ ओकली गेली की, मी बेईमान आहे. उभा महाराष्ट्र मला ओळखतो. मी माझ्या आयुष्यात कधीही बेईमानी केली नाही. काही बिल्डर, शेतकरी, राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या लोकांनीही कारखाने घेतले आहेत. पण त्यांच्याबद्दल बोललं जातं नाही, पण माझ्या नातेवाईकांबद्दल बोललं जातं असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.(Ajit Pawar’s warning to the opposition, will he hold a big secret blast with a press conference?)

हे पण पहा –  ‘नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय’ | विखे म्हणतात, ‘रुको जरा सबर करो!’

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: