
प्रतिनिधी DNA मराठी टीम
मुंबई – राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाण्यात मंगळवारी (12 एप्रिल) उत्तरसभा घेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते पण सुप्रिया सुळे यांच्या घरी पडत नाही. याचं कारण मला कळेल का? कारण महाराष्ट्रात एकेक जण पोहोचवला की शरद पवार दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला पोहोचतात. पुढचा माणूस सांगायला. अनिल देशमुख गेले, त्यानंतर परत एक भेट घेतली. अजितचं काय? मग रेड टाकल्या असं राज ठाकरे म्हणाले. या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Related Posts
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्यांना भेटण्यासाठी आज अजित पवार रुग्णालयात आले होते तेव्हा प्रसारमाध्यमांनी राज ठाकरेंनी केलेल्या टीकेबाबत अजित पवारांना विचारले. यावेळी अजित पवार म्हणाले, मी आज धनंजय मुंडे यांना भेटायला आलो आहे. आज वेगळ्या कारणासाठी आलो आहे. तुम्ही… कोणीतरी काही तरी बोलणार आणि पुन्हा त्यावर विचारणार.. त्याला फार महत्व देऊ नका. त्यांना फार महत्त्व देऊ नका. माझ्यादृष्टीने आज धनंजयची प्रकृती फार महत्त्वाची आहे, माझा सहकारी तिथे अॅडमिट आहे त्याला भेटायला आलो आहे. दुसऱ्याही प्रश्नांची उत्तरे योग्य वेळी देईन त्याबद्दल काळजी करु नका. माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावर ईडीने टाकलेल्या धाडीचा उल्लेख करत शरद पवारांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यावरही सडकून टीका केली. “सुप्रिया सुळे यांनी काही बोलायचे नाही. यांचे खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे ‘सुळे’ वेगळे आहे”, असा घणाघात राज ठाकरे यांनी यावेळी केला. अजित पवारांकडे रेड पडते. अजित पवारांच्या सख्ख्या बहिणींच्या घरी रेड पडते. त्यानंतर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे अत्यंत मधूर संबंध असतात. हे कसं काय? पवारांना बोलताना भडकलेलं मी कधी बघितलं नाही. मी जेव्हा बोलत होतो तेव्हा सगळ्यांच्या शेपट्या आतमध्ये होत्या, असं राज ठाकरे म्हणाले.