तर विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करायला मागे पुढे पाहणार नाही – अजित पवार

0 267
नवी मुंबई –  शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणे वागत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही, असा सज्जड दम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी विमा कंपन्यांना दिला आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे राज्य सरकारने भरले आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसतेय. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असेही अजित पवार यांनी सांगितले. पीक विमा हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे, तो मिळाला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Ajit Pawar will not look back to file charges against insurance companies)
तसेच नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे, त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, जसे जसे पंचनामे येतील तशी लगेच मदत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मराठवाड्यात आठ जिल्हे आहेत. सहा जिल्ह्यांची माहिती आल्यानंतर दोन जिल्ह्यांसाठी इतर जिल्ह्यांना मदत देण्यापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे सर्व विभागांना शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात राज्य सरकारचे निर्देश असल्याचे अजित पवार स्पष्ट केले.
Related Posts
1 of 1,635
शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पुरविण्याची खबरदारी महाविकास आघाडीचे सरकार घेत असून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मदत वाटपाचा आढावा घेतला जाणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.(Ajit Pawar will not look back to file charges against insurance companies)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: