DNA मराठी

अजित पवारांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा; म्हणाले 31 मार्चपर्यंत कामावर न परतल्यास..  

0 367
In that case, Ajit Pawar indirectly attacked Raj Thackeray;
प्रतिनिधी DNA मराठी टीम 
Related Posts
1 of 2,487

पुणे – मागच्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या ( ST employees) संपामुळे महामंडळाला मोठा नुकसान सहन करावा लागत आहे.यातच आता पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन करत 31 मार्चपर्यंत हे कर्मचारी कामावर हजर झाले नाही तर मग त्यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली जाईल असा सूचक इशारा दिला आहे.

कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास नेण्यात आलं आहे. 1 ते 31 मार्चचा पगार 10 एप्रिलपर्यंत झाला नाही झाला तर त्याचीही जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. आता संपकरी कर्मचाऱ्यांनी कोणाचंही न ऐकता कामावर रूजू व्हावं अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून एसटी बसचा संप सुरू असल्याने या विद्यार्थ्यांना बराच त्रास सहन करावा लागतोय. दुर्गम भागातील लोकांना दळणवळणासाठी परवडणारी वाहने नसल्याने नागरिकांनाही त्रास सहन कारावा लागतोय. या सगळ्यांची अडचण ओळखून कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर रूजू व्हावे अशी विनंती पवार यांनी केली आहे.

पगार, पगारवाढीची हमी, नोकरीची हमी, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता या महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्यानंतरही दिवाळीपासून अडेलतट्टू भूमिका घेतलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटविण्यासाठी राज्य सरकारने आठव्यांदा पुढाकार घेतला. कामगारांनी लोकांना वेठीस धरू नये, 31 मार्चपर्यंत कामावर हजर व्हावे. मात्र संप मिटल्याशिवाय कोणतीही चर्चा सरकार करणार नाही, अशी ठाम भूमिका परिवहनमंत्री अनिल परब यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत निवेदनातून मांडली होती .

संप सुरू होण्याआधी एसटी कर्मचाऱयांसोबत एक करार झाला होता. तेव्हा करारामध्ये अट आहे की, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढ या तीन प्रमुख मागण्या होत्या. विलीनीकरणाचा यात कोणताही मुद्दा नव्हता. आम्ही कामगारांच्या मागणीनुसार पगारवाढ केली. कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी राज्य सरकारने घेतली. कोणालाही त्यावेळी नोकरीतून काढले नाही. आताही 31 मार्चपर्यंत कामावर येणाऱया कर्मचाऱयांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी माहिती परिवहनमंत्र्यांनी दिली.

कर्मचाऱयांना सातव्या वेतन आयोगाच्या जवळ जाणारे वेतन

संप मागे घ्यावा यासाठी महत्त्वाच्या मागण्या मान्य करत सरकारने आतापर्यंत सात वेळा कर्मचाऱयांना आवाहन केले आहे. संप मिटविण्यासाठी सरकारने सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत. अगदी सातव्या आयोगाच्या जवळपास जाणारी वेतनश्रेणी कर्मचाऱयांना आता लागू झाली आहे. तरीही कर्मचारी माघार घ्यायला तयार नाहीत, असे परब यांनी स्पष्ट केले.

खूप झाले, आता संप मागे घ्या, सर्वपक्षीयांचेही आवाहन

परिवहनमंत्री अनिल परब यांनी सुरुवातीला कर्मचाऱयांनी 2 एप्रिल गुढीपाडव्यापर्यंत संप मागे घेण्याची मुदत जाहीर केली. मात्र कर्मचाऱयांना आता जास्त मुदतवाढ देऊ नका. त्यांना 31 मार्चपर्यंत मुदत द्या, नवीन वर्षही सुरू होणार आहे. सरकारने महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. खूप झाले, आता संप मागे घ्या, असे आवाहन सर्वपक्षीय आमदारांनी एसटी कामगारांना केले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: