अजित पवार यांनी पाळला शब्द, आमदारांना दिला दसऱ्याचे गिफ्ट

0 1,389
नवी मुंबई –  राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकासनिधीत वाढ (Local Development Funds) करण्याचा निर्णय राज्य सरकार(State Government) ने घेतला आहे. राज्य सरकारने विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांच्या विकास निधीत एक कोटी रुपयांची वाढ केली असून आता आमदारांना विकासकामांसाठी चार कोटी इतका निधी मिळणार आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थखात्याची जबाबदारी हातात घेतल्यापासून यावर्षात दोनदा या निधीत वाढ करण्यात आली आहे.(Ajit Pawar kept his word, gave Dussehra gift to MLAs)
वाढीव निधीच्या माध्यमातून आमदारांना आपल्या मतदारसंघातील विकासकामे पूर्ण क्षमतेने करता यावीत हा या निर्णयामागील हेतू आहे. या निधीचा उपयोग विशेषत: शाळांमधील वर्गांचे बांधकाम, अंगणवाडी केंद्र बांधकाम, व्यायामशाळा, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी, कोल्हापूर पद्धतीचे लहान बंधारे, अशा सार्वजनिक उपक्रमांची डागडुजी तसेच बांधणी करण्यासाठी होणार आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांच्या या नियोजनाचे कौतुक खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेतही केले होते. कोरोनामुळे एकीकडे केंद्र सरकारने खासदार निधीत कपात केली असताना दुसरीकडे राज्य सरकारने मात्र आमदारांना निधी कमी पडू दिलेला नाही. त्यामुळे अजित पवार यांनी अर्थखात्याचे जशारीतीने नियोजन केले, ते केंद्रानेही शिकावे, अशी सूचनाच सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेत केली होती.
दरम्यान, २०११-१२ या आर्थिक वर्षापासून रु. दोन कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला जात होता. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या निधीत एक कोटींची वाढ करुन तो निधी तीन कोटी इतका केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा या निधीत एक कोटींची वाढ करुन हा निधी चार कोटींपर्यंत वाढविण्यात आला आहे.(Ajit Pawar kept his word, gave Dussehra gift to MLAs)
Related Posts
1 of 1,494
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: