सोशल मीडियावर फोटो व्हायरल केल्याने अहमदनगर शहरातील एका युवकाला अटक ..

0 373

अहमदनगर – सोशल मीडिया (social media) वर नागपूर येथे शिक्षण घेत असलेल्या मुलीचे अहमदनगर शहरातील एका युवकाशी मैत्रीण झाली. त्यांनतर मैत्रीणचे रूपांतर प्रेमात झाले. माञ हा प्रेम प्रकरण मुलीच्या घरच्यांना कळताच त्यांनी या प्रेमसंबंधाला विरोध केला आणि मुलासोबत कायमचे संबंध तोडायला सांगितले. तसे त्या मुलीने केले सुद्धा. (Ahmednagar youth arrested for making photo viral on social media)

या प्रकाराने संतापलेल्या मुलाने तिच्यासोबतचे वैयक्तिक फोटो समाज माध्यमावर टाकून तिची बदनामी केली. दरम्यान, मुलीने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी मुलाला अहमदनगर येथून अटक केली.

पिंपरीमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा, मात्र अजित पवार गैरहजर चर्चांना उधाण..

Related Posts
1 of 1,481

 मिळालेल्या माहितीनुसार, पीडित युवती नागपूर येथे शिक्षण घेत असताना समाजमाध्यमावरून तिची अहमदनगर येथील अमर शिंदे याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर तो तिला भेटायला नागपूरलासुद्धा आला. या भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनीही लग्न करायचे ठरविले. एकमेकांवर विश्‍वास ठेऊन सोबत फोटोही काढले. परंतु, ही बाब पीडित मुलीच्या घरच्यांना कळताच त्यांनी तिला त्याच्याशी संबंध ठेवायचे नाही असे सांगितले. तिनेसुद्धा त्यास तसे सांगितले. हाच राग मनात ठेऊन त्याने तिच्या वडिलांस काहीतरी वाईट शब्दात बोलल्याने तिने त्याच्यासोबतचे संबंध तोडले. ही गोष्ट अमर शिंदे यास खटकल्याने त्याने रागाच्या भरात तिच्यासोबतचे वैयक्तिक फोटो व्हायरल करुन तिची बदनामी केली. त्यामुळे पीडित मुलीने पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिस स्टेशन कारंजा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार दारासिंग राजपूत यांनी एक पथक अहमदनगर येथे रवाना करीत अमर शिंदेला अटक केली.(Ahmednagar youth arrested for making photo viral on social media)

 हे  पण पहा –  शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या… | आ. मोनिका राजळे आक्रमक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: