DNA मराठी

मिरवणुकीवर समाजकंटकांची दगडफेक आज सकल हिंदू समाजाचा मोर्चा शेवगाव पाथर्डी बंद

शिवाजी चौकापासून बाजारपेठेत दगडांचा मारा करण्यात आला

0 202

शेवगाव : शहरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर अज्ञात समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली. दगडफेकीनंतर दोन गट एकमेकांना भिडले. काही वेळातच दंगल सदृश्य वातावरण निर्माण झाले. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

अकोल्याच्या दंगलीला जबाबदार कोण?
महात्मा सार्वजनिक वाचनालय, शिवाजी चौकापासून बाजारपेठेत दगडांचा मारा करण्यात आला. यात कित्येक वाहनांचे नुकसान झाले. दुकानांच्या दर्शनी भागाच्या काचा फुटल्या. चार चाकी वाहनांची ही तोडफोड करण्यात आली. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी करीत प्रचंड दगडफेक केली. पोलिसांनी जमाव पांगवल्यानंतर रस्त्यावर दगड, चपला आणि फोडलेल्या गाड्यांच्या काचांचा खच पडला होता.

ही सर्व दंगल सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली असून फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. शहरातील नागरिकांनी शांतता राखून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने लाऊड स्पीकरद्वारे करण्यात आले.
दगडफेक आणि मारहाणीत जखमी झालेल्या अनेकांना विविध हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री उशिरा अतिरिक्त फौजफाटा शहरात मागविण्यात आला होता. पोलिसांची वेगवेगळी पथके करून आरोपींची धरपकड सुरू केली होती.

 

या प्रकरणांमध्ये 112 नावांचं शंभर ते दीडशे इतर असे 212 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये 29 आरोपींना अटक करण्यात आली असून दोघांना ताब्यात घेतले आहे आरोपींना कोर्टामध्ये हजर केले असता आठ दिवसाची पोलीस कुठली आरोपींना देण्यात आली आहे.

Related Posts
1 of 2,494

अकोल्याच्या दंगलीला जबाबदार कोण?

याचा निषेध करण्यासाठी शेवगाव पाथर्डी दोन्ही तालुक्यात बंद ठेवण्यात आलेला आहे तर सकल हिंदू समाजाच्या वतीने शेवगाव मध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत बंद करण्याचा आव्हान काही संघटनांनी केला आहे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: