DNA मराठी

शेवगाव ची दंगल पूर्वनियोजित, आपल्या मनगटात दम ठेवा – विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे

0 278

शेवगाव : विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज शेवगावला भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी दंगल घडली त्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली यावेळी स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.


शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी दगडफेक करून शेवगाव शहरातमध्ये जाळपोळ केलेली आहे. या दंगलग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे शेवगाव मध्ये आले होते. दानवे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते या भागाची पाहणी करून ज्या व्यापाऱ्यांची दुकाने फोडून गाड्यांची जाळपोळ केली होती त्या नागरिकांशी ते चर्चा केली,


छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरामध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी त्यानंतर शहरांमध्ये दंगल घडवली. या दरम्यान काही समाजकंटकांनी मुख्य बाजारपेठेमध्ये दुकानाचे जाळपोळ केली. या तोडफोड केली. यामध्ये लाखो रुपयांचे व्यापार्यांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर समाजकंटकांनी काही घरांवर दगडफेक केली. त्यामुळे स्थानिक भयभीत झाले होते. या दंगलग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे आले होते. यावेळी त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी करून स्थानिक नागरिकांची चर्चा केली यावेळी त्यांनी खास करून व्यापारी वर्गाची ही संवाद साधला, व्यापाऱ्यांनी आपल्या व्यथा दानवे समोर मांडले आहेत. या दंगलीमध्ये समाजकंटकांनी मोठी दहशत माजवली होती त्यामुळे व्यापारी वर्ग दहशतीखाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Related Posts
1 of 2,531

 Rohit Pawar:- हा प्रस्ताव रखडल्याने रोहित पवार आक्रमक…

यावेळी बोलतात अंबादास दानवे म्हणाले प्रत्येक वेळेस आमची किंवा पोलिसांची वाट पाहू नका आपल्याही मनगटात दम ठेवा असेही दानवे म्हणाले

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: