DNA मराठी

अहमदनगर रायफल अँड पिस्तोल शूटींग क्लबचे राज्यस्तरीय स्पर्षामध्ये घवघवीत यश

0 76

 

अहमदनगर – दि ४ मे २०२२ ते ८ मे २०२२ नाशिक येथे झालेल्या भिष्मराज बाम मेमोरियल राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये अहमदनार रायफल अँड पिस्तोल शूटिंग रेंज च्या खेळाडूचे घवघवीत यश. यामध्ये दोन सुवर्ण,दोन रोप्य ,दोन कास्य पदक पटकाविले.

 

यामध्ये अहमदनगर शूटींग क्लबचे १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात गौरव खेडकर याने सिनियर गटात सुवर्ण पदक ,कु मंजू खाडे हिने सिनियर गाटात रोप्य पदक, कु श्रावणी भगत हिने सब युथ गटात रोप्य पदक तसेच राज फटांगडे याने सब युथ गटातू कांस्य पदक व रोनक टोकशिया याने {ISSF} कॅटेगिरी मध्ये सिनियर गटात कास्य पदक व १० मी ओपन साईट खेळप्रकारात रोहीत वाघ याने चांगली कामगिरी करत सुवर्ण पदक पटकाविले.

 

Related Posts
1 of 2,482

वरील सर्व यशस्वी खेळाडूना श्री. अलीम शेख श्री. ऋषिकेश दरंदले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.वरील सर्व यशस्वी खेळाडूंना अहमदनगर जिल्हा क्रिडा आधिकारी श्री. माग्यश्री बिले मॅडम, क्रिडा आधिकारी श्री. दिपाली बोडखे मॅडम, क्रिडा आधिकारी बॅडमिंटन प्रशिक्षक विशाल गर्जे बाळासाहेब पवार यानी पुढील स्पर्धेसाठी
शुभेच्छा दिल्या.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: