अहमदनगर : तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 आणि शसुत्र अधिनियम 1959 नुसार कलम 504,506,04 आणि 25 अंतर्गत बाबा खान ( राहणार मुकुंदनगर अहमदनगर) याच्यासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा दूध डेरीचा व्यवसाय असून 29 डिसेंबर 2022 रोजी रात्री साडेसातच्या सुमारास फिर्यादी यांच्या मंगलगेट येथील जय भगवान दूध डेरीवर बंदूक, तलवारी तसेच लाकडी दांडके घेऊन जाऊन फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाला बाबा खानसह इतर तीन जणांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.

 

या प्रकरणात आज 21 जानेवारी 2023 रोजी बाबा खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई तोफखाना पोलीस करत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *