अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा ‘ऑफिसर चॉईसच्या’ बॉटलचा साठा जप्त

0 232

अहमदनगर –  कर्जत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राक्षस वाडी खुर्द फाट्यानजीकच्या हॉटेल शिवार (Hotel Shivar) येथे अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Ahmednagar Local Crime Branch) पोलिसांनी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास छापा टाकला आहे. या कारवाईत दारूचा साठा जप्त करण्यात आला असून बाळू भानुदास काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ahmednagar Local Crime Branch raids, confiscates stock of ‘Officer’s Choice’ bottles)

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त माहिती मिळाली होती की राक्षस वाडी खुर्द गावाच्या शिवारात शिवार हॉटेलच्या आडोषाला बाळू काळे हा देशी दारू, विदेशी दारूची अवैध विक्री करत आहे. तेथील सर्व परिसरामध्ये वन विभागाचे जंगल असल्यामुळे तिथे दारू मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने होत आहे .त्यानुसार अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील चव्हाण,पोलीस नाईक शंकर चौधरी,पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी कोतकर,पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील माळशिकारे या पथकातील कर्मचाऱ्यांनी खाजगी वाहनातून जाऊन तेथे सापळा लावला काही वेळातच पोलिसांना हॉटेलच्या आडोशाला एक व्यक्ती दारू विक्री करताना दिसला पोलिसांनी तात्काळ त्याच्यावर छापा टाकला.
मात्र पोलिसांची व पंचांची चाहूल लागताच तो हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या वन विभागाच्या जंगलात अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला परंतु तेथील व्यक्तींनी त्याचे नाव बाळू भानुदास काळे राक्षस वाडी खुर्द असे पोलिसांना पोलिसांना सांगितले छोट्या मध्ये ऑफिसर चॉईस नावाच्या दारूच्या बाटल्या मुद्देमाल जप्त करण्यात आले.
Related Posts
1 of 1,608
आरोपी हा विनापरवाना बेकायदा देशी-विदेशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगून विक्री करत होता त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रोव्हीबीशन ६५ (ई)प्रमाणे कायदेशीर फिर्याद अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास कर्जत पोलिस करत आहे. (Ahmednagar Local Crime Branch raids, confiscates stock of ‘Officer’s Choice’ bottles)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: