अहमदनगर जिल्हा रुग्णालय आगप्रकरणी.., चार आरोपींना अटक

0 445

अहमदनगर –  जिल्हा रुग्णालयातील (District hospital) अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी येथील तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यात ९ नोव्हेंबर सायंकाळी चार जणांना अटक करण्यात आली. आरोपींमध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिका यांचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली आहे. यातील शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात आले आहे, तर शेख आणि आनंत यांचा सेवा समाप्ती करण्याचा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचा आदेश आहे.(Ahmednagar district hospital fire case: Four accused arrested)

दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संघटनांनी परिचारिकांना या गुन्ह्यात अटक केल्यामुळे निषेध नोंदवला असून ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप केला आहे. यामधील प्रमुख सुत्रधाराला अटक करण्याची मागणी केली आहे. शनिवारी (६ नोव्हेंबर) जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागाला आग लागली आहे. या दुर्घटनेत अकरा रुग्णांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहे.

कार विहिरीत कोसळून चार जणांचा जागीच मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

Related Posts
1 of 1,608

या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्वतः ही सोमवारी ही माहिती दिली होती. त्यातच  मंगळवारी तोफखाना पोलिस ठाण्यात याप्रकरणी तीन जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये चार आरोपींना अटक केली आहे. सदरच्या अटकेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत त्यांच्या भोवतीचा फास आवळला जात आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके (Sandeep Mitke)  करीत आहेत. (Ahmednagar district hospital fire case: Four accused arrested)

हे पण पहा –  फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, पहा हा भीषण आगीचा व्हिडिओ

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: