नुपूर शर्मा यांच्या अटकेच्या मागणीवरून अहमदनगर बंद…!

0 570

 

प्रतिनिधी सय्यद शाकीर

अहमदनगर – भारतीय जनता पक्षाच्या (BJP) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि भाजप दिल्लीचे सोशल मीडिया (Social media) प्रभारी नवीन जिंदल (Naveen Jindal) यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशात चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

 

Related Posts
1 of 2,197

मुस्लिम समुदाय नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांना अटक करण्याच्या मागणीवरून संपूर्ण देशात आज प्रदर्शन करत आहे. यातच अहमदनगर शहरात देखील नुपूर शर्मा यांच्या अटकेच्या मागणीवरून मुस्लिम समुदायकडून शहर बंदाची हाक देण्यात आली आहे. या बंदला आज शहरात उस्पूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

 

शहरातील मुकुंदनगर , कोठला, झेंडीगेट , पाचपीर चावडी पिरशाह खुंट , रामचंद्रखुट सर्जेपुरा, भिंगार आदी भागात कडकडीत बंद पाडण्यात आले आहे. तसेच भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: