DNA मराठी

Ahmednagar Crime :- गुप्ती व फायटर बाळगणारा जेरबंद…

बेकायदेशीर गुप्ती व फायटर बाळगल्या प्रकरणी एका इसमला कोतवाली पोलीसांनी घेतले ताब्यात

0 182
Ahmadnagar Criminal Secret Seized

नगर : बेकायदेशीर गुप्ती व फायटर बाळगल्या प्रकरणी एका इसमला कोतवाली पोलीसांनी घेतले ताब्यात आहे. २८ मार्चला रात्री दीडच्या सुमारास कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अहमदनगर शहरात एक इसम हा त्याचे लाल रंगाच्या बिगर नंबर प्लेटच्या होंडा डिओ मोपेड वाहनाच्या शिटखालील डिक्कीमध्ये गुप्ती व फायटर घेवून फिरत आहे. तो कोठा स्टॅण्डकडून हातमपुरा चौकाकडे जात आहे, अशी खबर मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कोतवाली पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांना सदर ठिकाणी जावून कारवाई करण्याचे आदेश दिले.

सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आमदार लंके अधिवेशनात करणार तांराकीत प्रश्न उपस्थित !

पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी रामचंद्र खुंट या ठिकाणी जावून सापळा लावून नमूद मोपेड वरील इसमास जागीच पकडून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अल्फाज अन्सार शेख (वय २१ वर्षे रा. भांबळ गल्ली, भोसले आखाडा, अहमदनगर) असे सांगून पोलिस अंमलदार यांनी त्याचे मोपेड गाडीच्या डिक्कीची पाहणी केली असता त्यात एक धारदार गुप्ती व एक स्टीलचा फायटर मिळून आला.

Related Posts
1 of 2,494

त्याबाबत त्यास विचारपूस करता त्यास समाधानकारक उत्तरे देता आली नाही त्या मुळे आरोपी विरोधात पोलिस कॉन्स्टेबल दीपक मिसाळ यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं.२९९/२०२३ आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस नाईक बाळासाहेब मासळकर हे करत आहेत. ही कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/ चंद्रशेखर यादव, पोसई/ एस. के. दुर्गे, पोलीस अंमलदार दिपक मिसाळ, गणेश ढोबळे, अशोक सायकर, अशोक कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: