
श्रीगोंदा : जिल्हा परिषद गट व गणाची प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आढळगाव जिल्हा परिषद गटातील अनेक इच्छुक कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
पूर्वी श्रीगोंदा तालुक्यात सहा गट अस्तित्वात होते पण नवीन धोरणानुसार एक गट वाढला असल्यामुळे अनेक गट व गणाची मोडतोड झाली आहे. यामध्ये आढळगाव गटाचा ही समावेश आहे. हा गट पुर्वी पासून आमदार बबनराव पाचपुते यांचा बालेकिल्ला मानला जातो कारण विस वर्षापासून या गटाचे नेतृत्व आमदार बबनराव पाचपुते समर्थक करत आहेत.
पण आता गटाची विभागणी झाली असल्यामुळे आगामी निवडणुकीत रंगत येणार आहे. या गटात सध्यातरी इच्छुकांची संख्या जास्त दिसत आहे.
कारण पुर्वीचा आढळगाव पंचायत समिती गणातील चांडगाव, हिरडगाव ही गावे पेडगाव गणात गेली असल्यामुळे इच्छुकांमधील माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के, माजी उपसभापती हरिदास शिर्के, आढळगाव चे माजी ग्रामपंचायत सदस्य शरद जमदाडे, उत्तम राऊत, पेडगावचे माजी सरपंच रोहिदास पवार (आर के) पवार व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य पंचशीला गिरमकर नव्याने या गटाला जोडलेले तांदळीदुमाला गावचे सरपंच संजय निगडे, नागवडे कारखान्याचे माजी संचालक अॅडव्होकेट सुनील भोस गटातून उमेदवारी करु शकतात.
महाविकास आघाडी श्रीगोंदा तालुक्यात एकीचे बळ दाखवते का आघाडीत बिघाडी होते. यावरही निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. सध्यातरी आघाडीत बिघाडी दिसुन येते. कारण गत कारखाना निवडणुकीपासून नागवडे जगताप गटात सर्व अलबेल असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या गटात तिरंगी निवडणुक होणार असे सध्या तरी दिसून येते. या गटात उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठींना मोठा त्रास होणार हे निश्चित आहे.