ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी नोंदवला तहसीलदार ज्योती देवरे यांचा जबाब

0 452
 अहमदनगर  –  अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील तहसीलदार ज्योती देवरे (Tehsildar Jyoti Deore) यांची एक ऑडिओ किल्प (Audio Clip) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (viral) झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या किल्प मध्ये तहसीलदार ज्योती देवरे आत्महत्याचा इशारा देत आहे.(After the audio clip went viral, the police recorded the reply of Tehsildar Jyoti Deore)
या प्रकरणात आता अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (Manoj Patil)  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ज्योती देवरे यांची भेट घेतली . पोलिसांच्या या भेटीनंतर आता आपण ठीक असून स्टेबल असल्याचा खुलासा ज्योती देवरे यांनी केला असून त्याचबरोबर आपण आत्महत्त्या करणार नसल्याचे लेखी आश्वासन देखील ज्योती देवरे यांनी पोलिसांना दिले आहे.
Related Posts
1 of 1,512

हे पण पहा – महिला तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडियो सुसाईड नोट व्हायरल-(Tehsildar Jyoti Deore)

ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ज्योती देवरे यांची भेट घेतली. त्यानंतर ज्योती देवरे यांनी लेखी आश्वासन दिले आहे. त्याच बरोबर जिल्हाधिकारी, प्रशासन आणि पोलिसांनी सहकार्य केलं असून समाधानी असल्याचं देखील सांगितल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. मात्र असे असले तरी ज्योती देवरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे.  (After the audio clip went viral, the police recorded the reply of Tehsildar Jyoti Deore)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: