बहिणीची छेड काढल्याने भावांनी केली तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

0 371

नागपूर –  शहरातील कपिल नगर परिसरात आपल्या बहिणीची छेड काढल्याचा राग रागातून दोन भावंडांनी एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपी भावंडांना अटक केली आहे.हत्या झालेल्या तरूणाचा नाव कमलेश आहे. (After teasing his sister, the brothers killed the young man with a sharp weapon)

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक कमलेशने काही दिवसापूर्वी परिसरात एका मुलीची छेड काढली होती. त्यानंतर पीडित तरुणीने कपिल नगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक देखली केली होती. नुकताच कमलेश हा जामिनावर बाहेर आला होता.

“हा” निर्णय घेत तालिबान ने दिला भारताला मोठा धक्का ……..

Related Posts
1 of 1,608

आपल्या बहिणीची छेड काढल्याच्या रागातून संतप्त झालेल्या दोन भावंडांनी बुधवारी रात्री कमलेशला गाठले. त्यानंतर दोन्ही भावंडांनी कमलेश याच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली.  या घटनेनंतर पोलिसांनी उज्वल आणि दीपक या दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. बहिणीची छेड काढल्याने या दोघांनी कमलेश याची हत्या केल्याची माहिती समोर येत असली तरी पोलीस या प्रकरणी विविध अँगलने तपास करत आहेत.(After teasing his sister, the brothers killed the young man with a sharp weapon)

हे पण पहा –  मी नव्हे  तो पुन्हा येईल… ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: