शिखर धवनपासून विभक्त झाल्यानंतर पत्नी आयेशा इन्स्टाग्रामवर म्हणाली …..   

0 453
नवी मुंबई –  भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan)  आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी (Ayesha Mukherjee)  यांनी निर्णय घेत एकमेकांपासून विभक्त झाले आहे. आपल्या नऊ वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.आयेशाचं हे दुसरं लग्न होतं. याआधीही तिचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे तिच्यावर दुसऱ्यांदा घटस्फोट घेण्याची वेळ आली आहे.  ही माहिती देत आयेशाने आपल्या इंस्टग्राम (Instagram ) अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केला आहे. (After splitting from Shikhar Dhawan, wife Ayesha said on Instagram …..)

या पोस्टमध्ये ती म्हणली कि जोपर्यंत मी दोन वेळा घटस्फोटित झाले नाही तोपर्यंत घटस्फोट हा खूप घाणेरडा शब्द असल्याचं मला वाटत होतं. शब्दांचे इतके शक्तिशाली अर्थ आणि संगती असू शकते हे मजेशीर आहे. मी घटस्फोटित म्हणून पहिल्यांदा याचा अनुभव घेतला. जेव्हा पहिल्यांदा माझा घटस्फोट झाला तेव्हा मी खूप घाबरले होते. त्यावेळी मला मी खूप काही चुकीचं करत असल्याचं वाटत होतं, असं आयेशाने म्हटलं आहे. मी प्रत्येकाला निराश करत असून स्वार्थी असल्याचंही वाटत होतं. मी माझ्या कुटुंबाला, मुलांना आणि काही प्रमाणात देवालाही निराश करत असल्याची भावना जाणवत होती.

पोस्टमध्ये पुढे तिने म्हटलं आहे की, मग आता विचार करा, मला दुसऱ्यांदा यामधून जावं लागत आहे. हे भयानक आहे. याआधीही माझा घटस्फोट झाला असून दुसऱ्या वेळी माझं खूप काही पणाला होतं असं वाटत होतं. मला खूप काही सिद्ध करायचं होतं. पण जेव्हा माझं दुसरं लग्न मोडलं तेव्हाही भीती वाटली. पहिल्यांदा ज्या भीती, अपयश आणि निराशा या भावना होत्या त्या पुन्हा तशाच आल्या.   अशी पोस्ट तिने आपल्या इंस्टग्राम अकाउंटवर लिहिली आहे.

Related Posts
1 of 65

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून 30 टक्के आमदारांना तिकीट नाही

ऑक्टोबर २०१२ मध्ये शिखर धवनने आयेशा मुखर्जीसोबत लग्न केलं. आयेशाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. शिखर आणि आयेशा यांना एक सात वर्षाचा मुलगा असून त्याचं नाव जोरावर आहे. २०१४ मध्ये जोरावरचा जन्म झाला. मेलबर्नमध्ये राहणारी आय़ेशा मुखर्जी लग्नाच्या नऊ वर्षांनी शिखर धवनपासून विभक्त होत आहे.(After splitting from Shikhar Dhawan, wife Ayesha said on Instagram …..)

हे पण पहा – पैसे परत मागितल्याच्या रागातून माखिजा यांना मारहाण

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: