‘गुलाब’ नंतर आता राज्यात धडकणार ‘ चक्रीवादळ, जाणुन घ्या संपूर्ण माहिती

0 770

नवी मुंबई – नुकतंच बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे (Gulab cylone Affect) आंध्रप्रदेश ओडिशासह महाराष्ट्रालाही अतिवृष्टीचा फटका बसला . या चक्रीवादळा नंतर आता राज्यात परत एकदा चक्रीवादळ येत आहे गुलाबनंतर आता ‘शाहीन’ (Shahin Cyclone ) नावाचं चक्रीवादळ येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातच्या भागांना धडक देणार अशा इशारा IMD नं दिला आहे.

गुलाबपेक्षा भयंकर असेल शाहीन अरबी समुद्रात हे वादळ तयार होणार आहे. या चक्रीवादळाला ‘शाहीन’ असं नाव देण्यात आलं आहे. हे नाव ओमान देशानं दिलं आहे.

अशा स्थितीत पुढील दोन-तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कारण या दोन दिवसात छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशामध्ये असलेलं कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रापर्यंत पोहोचणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार ते 30 सप्टेंबर रोजी अरबी समुद्रावर पोहोचेल. इथे आल्यावर ते आपला स्वरूप बदलण्याची शक्यता आहे.

बेलवंडी पोलीस ठाण्यात लाचेची मागणी गुन्हा दाखल,आरोपी ताब्यात

Related Posts
1 of 1,499

 IMD नं दिलेल्या माहितीनुसार शाहीन हे चक्रीवादळ गुलाबपेक्षा भयन्कर आणि तीव्र असणार आहे. मात्र माहितीनुसार हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या पश्चिमी तटांवर न धडकता समुद्रातुनच ओमानच्या दिशेनं निघून जाणार आहे. मात्र याचा प्रभाव महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांमध्ये पडणार आहे.

या राज्यांच्या काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस येण्याची शक्यता असणार आहे. गुलाबचा हाहाकार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ वादळानं फक्त ओडिशा आणि आंध्रप्रदेशमधेच नाहीतर छत्तीसगढ आणि महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमधेही हाहाकार माजवला आहे. सध्या राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडत आहे. मराठवाडा, आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं आहे.

हे पण पहा  – Ahmednagar breaking news | आयुर्वेद कॉनर जवळ बर्निंग कारचा थरार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: