रवी शास्त्री नंतर द्रविड होणार टीम इंडियाचा नवीन कोच, मिळणार ही जबाबदारी

0 300
After Ravi Shastri, Dravid will be the new coach of Team India

नवी मुंबई –  भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा (Indian men’s cricket team) मुख्य मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri)  यांचा कार्यकाळ पुढच्या महिन्यात टी- २० वर्ल्डकप (T20 World Cup)  संपल्यानंतर संपणार आहे.त्यामुळे रवी शास्त्री नंतर भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  शास्त्री नंतर भारतीय संघाचे प्रशिक्षकसाठी अनिल कुंबळे , (Anil Kumble) राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या नावाची चर्चा जोराने सुरु आहे. (After Ravi Shastri, Dravid will be the new coach of Team India)

मात्र टी20 वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ लगेच न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात टेस्ट सीरिज खेळणार आहे. या सीरिजसाठी राहुल द्रविड  टीम इंडियाचा कोच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजला 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजसाठी द्रविड भारतीय संघाचेचा  मुख्य प्रशिक्षक   होण्याची शक्यता असल्याचं वृत्त एका वर्तमान पत्राने दिले आहे.

हे पण पहा –  जमीर इनामदार यांचे हृदय विकराच्या झटक्याने निधन | देशसेवेत कार्यरत असताना निधन

Related Posts
1 of 88

मिळालेल्या माहितीनुसार भारतीया संघाच्या मुख्य प्रशिक्षकच्या निवड प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे दरम्यानच्या काळात अनुभवी द्रविडकडं ही जबाबदारी सोपवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. द्रविड सध्या बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) संचालक आहे. द्रविडनं टीम इंडियाचा पूर्णवेळ हेडकोच व्हावं अशी बीसीसीआयची इच्छा होती, पण द्रविडनं ती ऑफर नाकारली आहे.(After Ravi Shastri, Dravid will be the new coach of Team India)

भाजपला हे लक्षात आल्यानेच …… ,  शरद पवार यांचा भाजपावर गंभीर आरोप

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: