
प्रतिनिधी DNA मराठी टीम
मुंबई – गुढीपाडवा मेळाव्यात मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यांना विरोध करत मशिदीवरील भोंगे काढले नाही तर मशिंदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या वादामध्ये आता समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी (Abu Azmi) यांनी देखील उडी घेतली आहे. आझमी यांनी गणपती, नवरात्री, विवाह समारंभात लावले जाणारे डीजे यामुळे ध्वनीप्रदूषण होत नाही का? असं प्रश्न उपस्थित केला आहे .
Related Posts
अबु आजमी म्हणाले की “मशिदींवरील भोंग्यामुळे ध्वनी प्रदूषणाची तक्रार असेल, तर गणपती, नवरात्री, विवाह समारंभात लावले जाणारे डीजे यामुळे ध्वनीप्रदूषण होत नाही का?” असा सवाल अबु आझमी यांनी उपस्थित केला. “पण आम्ही कधी याबाबत तक्रार केली नसून केवळ निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी राज ठाकरे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं देखील आझमी म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता राज ठाकरेंच्या या भूमिकेला थारा देणार नाही, असा विश्वासही आझमी यांनी व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले की, “मशिदींपुढे हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही थंड पाणी, सरबत देऊ, धार्मिक तेढ निर्माण करणारे राजकारण आम्हाला नको”, असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाजी पार्क शांत भागात येतो. मग त्यांच्या सभेच्या वेळी आवाजाची पातळी किती होती व किती ध्वनिप्रदूषण, याची पोलिसांनी तपासणी करुन कारवाई करावी. सभा व अन्य कार्यक्रमांमध्ये लावले जाणारे ध्वनिवर्धक, फटाके यामुळेही ध्वनी प्रदूषण होते. पण आमची कधीच, काहीही तक्रार नाही,” असंही अबु आझमी म्हणाले.