कुणाल पांड्या नंतर भारताच्या आणखी दोन खेळाडूंना कोरोनाची लागण…

0 24

नवी मुंबई –  भारतीय क्रिकेटपटू कुणाल पांड्या (Kunal Pandya) याच्या संपर्कात आलेल्या कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gautam) आणि यजुवेंद्र चहल (Yajuvendra Chahal)  यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय संघ शिखर धवन (Shikhar Dhawan) यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंका विरोधात वनडे आणि टी-ट्वेंटी मालिका खेळत होती. वनडे मालिकेत भारतीय संघाने श्रीलंका संघाला 2-1 या फरकाने पराभूत करून मालिका आपल्या नावावर केली तर टी-ट्वेंटी मालिकेमध्ये वापसी करत भारतीय संघावर 2-1 ने विजय प्राप्त करून श्रीलंकाने आपल्या नावावर केली.(After Kunal Pandya, two more Indian players were infected with corona …)

धक्कादायक ! सेल्फीच्या नादात सोशल मीडिया स्टारचा मृत्यू….

Related Posts
1 of 48

T-20 मालिकेच्या पहिल्या सामन्यानंतर भारतीय खेळाडू कुणाल पांड्या याला कोरोनाची लागण झाल्याने त्याच्या संपर्कात येणाऱ्या सात ते आठ खेळाडूंना उर्वरित मालिका खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. या सात ते आठ खेळाडूमध्ये यजुवेंद्र चहल , कृष्णप्पा गौतम, मनीष पांडे(Manish Pandey) , हार्दिक पांड्या (Hardik Pandya), पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) , सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) , ईशान किशन (Ishaan Kishan) इत्यादी खेळाडूंचा समावेश होता. खबरदारीचा उपाय म्हणून  हा निर्णय घेण्यात आला होता.

या २५ जिल्ह्यात उठणार निर्बंध, तर या ११ जिल्ह्यात कडक निर्बंध कायम

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: