आयपीएलनंतर धोनी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?, धोनी म्हणाला ….

0 257
नवी मुंबई –  भारतीय क्रिकेट संघचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) च्या आयपीएल (IPL) मधील निवृत्तीबद्दल मागच्या काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरु आहे. मात्र आता या चर्चांवर उत्तर देत धोनीने आपण आयपीएल चा पुढच्या हंगाम खेळणार असून त्यानंतर निवृत्ती घेणार असल्याचा स्पष्ट केले आहे. धोनी आपला आयपीएलमधील शेवटचा सामना चेपॉक स्टेडियम वर खेळणार आहे.
सध्या काळात क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेक क्रिकेटर्स बॉलिवूड (Bollywood) मध्ये काम करत आहे. त्यामुळे धोनीही बॉलिवूडमध्ये अभिनय करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र धोनी अभिनय करण्यास फारसा इच्छुक नाही. अभिनय करणं सोप्पं नसून आपण क्रिकेटशीच जोडलेलो राहणार आहोत असं धोनीने स्पष्ट केलं आहे.
Related Posts
1 of 65

 

धोनीने याआधीच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासंबंधी आपलं मत व्यक्त केलं होतं. त्याने सांगितलं होतं की, तुम्हाला माहिती आहे की, बॉलिवूड हे काही मला जमणार नाही. जिथपर्यंत जाहिरातींचा संबंध आहे तर मी तिथे आनंदी आहे. पण जेव्हा चित्रपटांचा विषय येतो तेव्हा मला वाटतं हे आव्हानात्मक आहे आणि ते हाताळणंही खूप कठीण आहे. अभिनेते चांगलं काम करत असून मी हे त्यांच्यावर सोडून देईन. मी क्रिकेटशी संबंधित राहीन. जास्तीत जास्त मी जाहिरातींमध्ये अभिनय करु शकतो. त्यापेक्षा जास्त नाही.

Lakhimpur Kheri, परवानगी नाकारल्यानंतरही राहुल गांधी रवाना

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: