प्रेमप्रकरणाची माहिती प्रेयसीच्या भावाला दिल्याने प्रियकराने दिली ‘ही’ भयंकर शिक्षा

जळगाव – सोशल मीडियाच्या (Social media) काळात अनेक तरुण तरुणीची प्रेम प्रकरण लपून छपुन सुरू आहे. घरातील लोकांना प्रेम प्रकरण न समजण्यासाठी अनेक जण लपून छपुन प्रेम करत असतात मात्र ही बाबा कधीना कधी बाहेर येतच. अशीच एक धक्कादायक घटना जळगाव जिल्हयात घडली आहे. प्रेम प्रकरणाची माहिती प्रेयसीच्या भावाला दिल्याच्या रागातून दोघांनी पार्टी करण्याच्या बहाण्याने बोलावून घेत अनिकेत गणेश गायकवाड (वय २०, रा. राजमालती नगर, जळगाव) या तरुणाची चाकूने भोसकून तसेच दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री पिंप्राळा रेल्वे गेट नजीकच्या मालधक्क्यालगत घडली आहे.
सागर बाळू समुद्रे (वय १९, रा. राजमालती नगर) व सुमीत संजय शेजवड (वय १९, रा.हुडको, पिंप्राळा) या दोघांना पोलिसांनी बुधवारी पहाटेच ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर समुद्रे याचे एका तरुणीशी प्रेमप्रकरण होते. या तरुणीचा भाऊ अनिकेतचा मित्र होता. सागर व अनिकेत दोघं एकाच भागात राहात असल्याने त्यांच्यात ओळख व मैत्रीही होती. सागरच्या प्रेमप्रकरणाची माहिती अनिकेत याने तरुणीच्या भावाला दिली होती, शिवाय ‘मी तुझं काम लावलं आहे’ असे अनिकेत सागरला बोलला होता. त्यामुळे त्याचा राग सागरला आला होता. दोन दिवसापासून अनिकेतला खुन्नसही देत होता. त्यामुळे सागर याने सुमीत शेजवडला सोबत घेऊन अनिकेतचा गेम करायचा प्लॅन तयार केला.
सागर व सुमीत यांनी मंगळवारी रात्री अनिकेत याला पार्टीसाठी बोलावले. तिघांसाठी त्यांनी दारू, पाणी बाटल्या व पावभाजी घेतली. रेल्वे मालधक्क्यावर दोघांनी दारू पिण्याचे नाटक करून अनिकेतला जास्त दारू पाजली. त्यानंतर २ वाजता सागर याने चाकू काढून अनिकेतच्या डोक्यात घातला. मात्र हा चाकू लगेच तुटला. गंभीर दुखापत झाल्याने अनिकेतने तेथून निसटण्याचा प्रयत्न केला. थोड्या अंतरापर्यंत पळताच मागून दोघांनी त्याला पकडले. डोक्यात तीन वेळा दगडाने वार केले. त्यामुळे त्याच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा होऊन मेंदूच बाहेर आला. अनिकेतचे काम झाल्याची खात्री पटल्यावर दोघांनी तेथून पळ काढला. खुनाची घटना उघडकीस आल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासातच संशयितांना अटक केली. एकाच वेळी दोघांना पहाटेच्या सुमारास मेहरुन तलावाजवळून ताब्यात घेण्यात आले.