श्रीगोंदा वकील संघाच्या अध्यक्ष पदी adv.श्री.सदाशिव कापसे व उपाध्यक्ष पदी adv श्री.जयंत शिंदे यांची निवड

0 19

श्रीगोंदा :-  श्रीगोंदा वकील संघाच्या पदाधीकाऱ्यांची मुदत संपल्याने सन २०२१-२२ या कालावधी करिता निवडणूक निर्णय अधिकारी adv. श्री. आर के आचार्य यांनी दिनांक ५ मार्च २१ रोजी निवडणूक घोषित केली होती. त्याआधारे श्रीगोंदा वकील अध्यक्ष पदकरिता श्री. Adv. सदाशिव कापसे, उपाध्यक्ष पदकरिता श्री. Adv. जयंत शिंदे तसेच महिला प्रतिनिधी करिता adv. सौ. विजया घोडके तसेच सचिव पदाकरिता श्री. Adv. होले खजिनदार पदकारिता श्री. Adv. फाटे यांनी न्मनिर्देश पत्र निवडणूक अधिकारी यांचेकडे दाखल केले होते.

सर्व पदाधिकाऱ्यांच्या पदाकारिता इतर कोणाचेही नामनिर्देशन पत्र आले नाही. त्यामुळे श्रीगोंदा वकील संघाच्या अध्यक्ष पदी श्री. adv. सदाशिव कापसे, उपाध्यक्ष पदी adv. जयंत शिंदे, महिला प्रतिनिधी सौ. Adv. विजया घोडके, सचिव पदी adv. होले, खजिनदार पदी adv. फाटे यांची निवडणूक अधिकारी साहेब adv. आर. के. आचार्य यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता चालू वर्षी यात्रोत्सवास प्रतिबंध – पोलीस निरीक्षक रामराव ढिकले

Related Posts
1 of 1,292

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे adv. श्री बापूसाहेब भोस, adv गायकवाड, adv. रमेश जठार, adv. संदीप भोयटे, adv. श्री महेश लोणकर यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी नवीन पदाधिकाऱ्यांनी सर्वांना सोबत घेऊन, सर्वांच्या हितासाठी काम केले जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी श्रीगोंदा वकील संघांचे सर्व सदस्य उपस्थित होते.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. उदय शेळके यांची निवड 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: