दीपावलीच्या पार्श्वभूमीवर कापड बाजारात अतिरिक्त महिला पोलीस बंदोबस्त नेमणार -Dysp संदीप मिटके

0 131

अहमदनगर –   दीपावलीच्या पार्श्वभूमीवर कापड बाजारात होणारी गर्दी विचारात घेता अहमदनगर शहर पोलीस (Ahmednagar City Police) दलाच्या वतीने कापड बाजार व्यापारी असोसिएशन यांची बैठक घेतली त्या बैठकीला आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) उपस्थित होते.(Additional women police to be deployed in textile market on the backdrop of Diwali -Dysp Sandeep Mitke)

मागील दीड वर्षापासून धोरणामुळे ठप्प झालेला व्यवहार पूर्वपदावर येत आहे आगामी दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर कापड बाजारात खरेदी करता नागरिकांची झुंबड उडत असते. कोरोना चे नियम पालन करून व्यापार पूर्वपदावर आणण्याचा पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्या अनुषंगाने सदरची बैठक बोलविण्यात आली होती बैठकीमध्ये व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये गर्दी होऊ नये आणि कोरोना चा संसर्ग पुन्हा वाढ नये याकरता पोलीस प्रशासन दक्षता घेत आहे त्या अनुषंगाने व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर कापड बाजार मध्ये महिला मोठ्या संख्येने खरेदी करता येत असतात हे ध्यानात घेता कापड बाजारांमध्ये अतिरिक्त महिला पोलिस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे असे DySP संदीप मिटके (DySP Sandeep Mitke) यांनी कळविले.

‘या’ निवडणुकीत एकनाथ खडसे देणार भाजपाला मोठा धक्का , जाणून घ्या संपूर्ण माहिती

Related Posts
1 of 1,481

व्यापारी व नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आव्हान पोलीस विभागातर्फे करण्यात आलेले आहे. बैठकीनंतर आमदार संग्राम जगताप व Dysp संदीप मिटके यांनी कापड बाजारांमध्ये पायी फिरून परिस्थितीचा आढावा घेतला. सदरच्या बैठकीस आमदार संग्राम जगताप, Dysp संदीप मिटके, PI संपत शिंदे,PI ज्योती गडकरी,PI भोसले, API देशमुख, कापड बाजार व्यापारी असोसिएशनचे संभव काठेड,  कुणाल नारंग, ईश्वर  बोरा, प्रतीक बोगवत , विजय गुगळे,  विक्रम मुथा,  आनंद मुथा,  रवी कितनी, धीरज पोखर्णा, केतन मुथा,  संजय  चोपडा, विशाख वैद्य,  प्रकाश  बायड, संजय बोगावत , रवी कराचीवाला ,  धीरज मुनोत , दीपक नावालानी उपस्थित होते.(Additional women police to be deployed in textile market on the backdrop of Diwali -Dysp Sandeep Mitke)

हे पण पहा – तो दाढीवाला कोण एनसीबीच्या अधिकार्‍यांना माहीत आहे असा खळबळजनक गौप्यस्फोट नवाब मलिक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: