अ‍ॅड. सरिता साबळे यांच्या युक्तीवादाने खूनाच्या गुन्ह्यात आरोपीस जामीन मंजूर

0 192
अहमदनगर –  हत्याच्या गुन्हयात आरोपी असलेल्या ज्योती हजारे हिला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने २५ हजार पीआर बॉण्डवर जामीन मंजूर केला आहे. अ‍ॅडव्होकेट महेश तवले यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. सरिता साबळे (Sarita Sable)यांनी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये युक्तीवाद केला .
प्रकरण काय
जिल्ह्यातील चिचोंडी पाटील या गावामध्ये मागच्या दोन वर्षांपूर्वी अर्जुन गोविंद हजारे यांचा मुलगा अतुल हजारे अचानकपणे गायब झाला होता. याचा संशय ते त्यांची सून ज्योती हजारेवर घेत होते.
Related Posts
1 of 1,603
या कारणावरून सून ज्योती हजारे आणि गोविंद हजारे यांच्यात नेहमी वाद होत असे. मात्र 23 नोव्हेंबरच्या रात्री याच कारणाने त्यांच्यात भांडण सुरु होते पुढे या भांडणाच्या रूपांतर हाणामारीत झाले.  या हाणामारीत गोविंद हजारे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर बाबासाहेब चंदू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ज्योती हजारे याला नगर तालुका पोलिसांनी अटक केली होती.
या प्रकरणात महेश तवले यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा सत्र न्यायलायत अ‍ॅड. सरिता साबळे यांनी युक्तिवाद करून जामीन मिळवून दिला. या प्रकरणात अ‍ॅड. सरिता साबळे यांच्यासह अ‍ॅड. निलेश देशमुख यांनी काम पाहिले.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: