जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. उदय शेळके यांची निवड 

0 9

 अहमदनगर –   अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झालेल्या निवडणुकीनंतर  अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागले होते .  आज दि. ६ मार्च शनिवारी रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी  निवडी होणार आहेत  .

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय गुलाबराव शेळके यांची तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.

महिलेला बंदुकीचा धाक दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल

Related Posts
1 of 1,292

 या पदासाठी अ‍ॅड. शेळके यांचे नाव सुरूवातीपासूनच आघाडीवर होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी सकाळपासूनच यासाठी शहरात  तळ ठोकला होता. यावेळी अध्यक्षपदाची पहिली संधी राष्ट्रवादीला मिळाली असून, उपाध्यक्षपद काँग्रेसकडे गेले आहे. अ‍ॅड. शेळके हे राष्ट्रवादीचे आहेत. कानवडे महसूलमंत्री थोरात यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता औरंगाबादेत सोमवारपासून लॉकडाऊन ?

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: