“त्या” नोटीशीला अभिनेत्री शर्लिन चोप्राने दिला हा उत्तर, म्हणाली…

0 255
नवी मुंबई –    चर्चित  बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) याचा पती व्यवसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) मागच्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चा विषय बनला आहे. मुंबई पोलिसांनी व्यवसायिक राज कुंद्राला अश्लील चित्रपठ बनवल्याच्या प्रकरणात अटक केली होती. सध्या तो जामीन वर बाहेर आहे. (Actress Sherlyn Chopra responded to the notice, she said.)
With serious allegations against Raj Kundra and Shilpa Shetty, Sherlyn Chopra filed an FIR
याच दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) ने राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी वर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप लावले आहे. शर्लिनने लावलेल्या सर्व आरोप खोटे असल्याचे म्हणत शर्लिन विरोधात मानहानीचा गुन्हा राज कुंद्राने दाखल करून ५० कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून मागणी केली होती. त्यांच्या या नोटीशीवर शर्लिनने ट्वीट करत उत्तर दिले आहे.

 

Related Posts
1 of 84

शर्लिनने तिच्या ट्विटर अकाऊंटवर शिल्पा आणि राजने केलेल्या तक्रारीवर उत्तर दिल्याचे सांगितले आहे. ‘रिपु सूदन उर्फ राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा यांनी माझ्या विरोधात केलेल्या मानहानीच्या नोटीशीला माझ्या लीगल टीमने २३ ऑक्टोबर २०२१ रोजी उत्तर दिले आहे. मी दिलेल्या जवाबातील पहिल्या आणि शेवटच्या पानाचा हा फोटो’ या आशयाचे शर्लिनने ट्वीट केला आहे.  राज कुंद्राने फसवणूक केली असून शारीरिक शोषण केल्याचा आरोप शर्लिनने केला होता. एप्रिल २०२१मध्ये देखील शर्लिनने राज विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. राज कुंद्रा प्रकरणामध्ये क्राइम ब्रांचने शर्लिनची चौकशी केली होती. या प्रकरणातील ती महत्त्वाची साक्षीदार असल्याचे म्हटले जात होते.(Actress Sherlyn Chopra responded to the notice, she said.)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: