अभिनेत्री पूनम पांडेला पतीकडून मारहाण, पोलिसांकडून पतीला अटक

0 466
 नवी मुंबई –   बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री पूनम पांडे (Actress Poonam Pandey) ही आपल्या हॉट लूक(Hot looks)मुळे नेहमी सोशल मीडियावर (Social media) नेहमी चर्चेत असते. आपल्या वेगवेगळ्या फोटो किंवा व्हिडिओ मुळे ती चर्चेत असते मात्र सध्या ती एका वेगळ्याच कारणाने सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. तिने  तिच्या पती विरोधात वांद्रे पोलीस (Bandra Police) ठाण्यात मारहाण आणि घरगुती हिंसाचाराचा (domestic violence) आरोप लावत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारी नंतर वांद्रे पोलिसांनी पोलिसांनी पूनम पांडेचा पती सॅम बॉम्बे (Sam Bombay) याला अटक केली आहे. (Actress Poonam Pandey beaten by her husband, husband arrested)
अभिनेत्री पूनम पांडेने आपल्या तक्रारीत म्हटले की, सॅमची पहिली पत्नी अलविरा हिच्याशी बोलण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. याचा राग आल्याने सॅमने रागाच्या भरात पूनमचे ​​केस पकडून तिला ओढलं आहे. तसेच तिचं डोकं भिंतीवर आपटल्याचं देखील तक्रारीत म्हटलं आहे.

एवढंच नाही तर सॅमनं पूनमच्या चेहऱ्यावर ठोसा मारला आहे. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर अनेक जखमा झाल्या आहेत. सॅमने केलेल्या मारहाणीत पूनम पांडेच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे अभिनेत्रीला समोरचं पाहणंही कठीण झालं आहे. पूनम पांडे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. पूनम पांडेच्या तक्रारीनंतर आता वांद्रे पोलिसांनी सॅम बॉम्बेला अटक केली आहे. वांद्रे पोलिसांनी सोमवारी संध्याकाळीच सॅमला अटक केली असून संबंधित प्रकरणाचा तपास केला जात आहे.

Related Posts
1 of 96

या पूर्वी देखील पूनम ने पती सॅम विरोधात गोवामध्ये घरगुती हिंसाचाराचे  आरोप केले आहेत. लग्नानंतर काही दिवसांनी ते गोवा ट्रिपला गेले असता, पतीने मारहाण केल्याचा आरोप तिने केला होता. याप्रकरणी पूनमने गोव्यात पती सॅम विरोधात गुन्हा देखील दाखल केला होता.  लग्नानंतर अवघ्या 12 दिवसात दोघांमधील वाद पोलीस ठाण्यात पोहोचला होता. पण, त्यानंतर सॅमची जामिनावर सुटका करण्यात आली होती.(Actress Poonam Pandey beaten by her husband, husband arrested)

हे पण पहा –  जिल्हा रुग्णालयात भीषण आग, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत – राजेश टोपे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: